अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अग्निपथ भरती प्रकरणावरून देशभरात तीव्र आंदोलन उसळत असतांना आता मालेगावपर्यंत त्याचे लोण पोहचले आहे, मालेगावमध्ये सैन्य भरतीच्या तयारीसाठी मेहनत घेत असलेल्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात मोर्चा काढला. ‘भारतमाता की जय’ पुरी करो ,पुरी करो, हमारी मांगे पुरी करो’ च्या घोषणा देत मोर्चाने अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जोरदार निर्दशने केली. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी संवाद साधत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अग्नीपथ भरती घोरण अन्यायकारक असून त्यामुळे भरतीसाठी मेहनत घेणाऱ्यांवर तीव्र नाराजी असून अग्निपथ भरती त्वरित रद्द करावे अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.