अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
प्रतिवर्षाप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात १२ जुन २०२२ रोजी श्रीशिवराज्याभिषेक दिन अर्थात ३४९ व्या शिवशक वर्षाला सुरुवात होत आहे. याच निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मालेगावतर्फे श्रीशिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवतीर्थ मालेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पंचधातुच्या नाण्यांनी, सप्त गंगा (गंगा,यमुना,सरस्वती,नर्मदा,गोदावरी,सिधुं,कावेरी) या नद्यांचे जल, सप्त पर्वत (हिमालय,सह्याद्री,कैलास,गब्बार,मेरू,हिंदुकुश,मंदाराचल,) यांच्या मातीने दुधा-दही-मध-फुलांनी अभिषेक करून श्रीशिवराज्याभिषेक सोहळा वेदमंत्रांच्या घोषात आयोजित करण्यात आला होता. त्यासोबतच शिवमूर्तीस व शिवतीर्थस नेत्रदीपक सजावट करण्यात आली असून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त हिंदुत्व वादी संघटनेचे कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते.