अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्या अनेक ठिकाणी सर्व रस्त्यांवर मोकाट फिरणारे जनावर जागोजागी आढळतात.जे मिळेल ते खाण्याचा प्रयत्न ते करीत असतात.मालेगाव शहरात असे अनेक मोकाट जनावरे (वळू) सर्वत्र आढळत असतात,शहरातील वर्धमान नगर मध्ये असाच एक वळू खाण्याचा शोधात असतांना त्याने कोणी तरी फेकलेल्या गुलाब जामुनचा पत्र्याचा डब्बा त्याच्या तोंडी लागला आणि नेमका डब्बा त्याच्या तोंडात अडकून बसला,अखेर काही प्राणी मित्रांच्या लक्षात हा प्रकार येताच वळूच्या तोंडातील डब्बा काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले अखेर पशूवैद्यकिय डॉक्टर जावेद खाटीक यांना बोलविण्यात आले.अनेक प्रयत्ना नंतर वळूला दोर खंडाच्या सहाय्याने जेरबंद करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रयत्ना नंतर वळूच्या तोंडातील डब्बा काढण्यात आला यात त्याला जखम सुध्दा झाली डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर वळूची दोरखंडांतून मुक्तता करण्यात आली.