अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगावातील वाहतूक समस्या व रस्त्यांची दुरवस्था, वाढते अपघात, दुरावस्थेमुळे निर्माण होणाऱ्या इतर समस्याचा प्रशासकीय स्थरावर पाठपुरवठा करण्यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे मौसम पुला जवळील महात्मा गांधी पुतळ्या जवळ मानवी साखळी करण्यात आली होती. यावेळी या मागण्या करण्यात आल्या.
या आहेत मागण्या.
१) शहरात सर्वत्र सी.सी. टी. व्ही. यंत्रणा कार्यान्वित करावी. पोलीस नियंत्रण कक्ष, मनपा मुख्यालय येथे कंट्रोल रूम कार्यान्वित करावा.
२) शहर वाहतूक पोलीस शाखेला पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी प्रभारी म्हणून नेमणूक करावा, पोलीस सह. निरीक्षण, उप निरीक्षक, वाहतूक पोलीस कर्मचारी, आदींची नेमणूक करावी. बेशिस्त वाहतुकीवर परिणामकारक कारवाई करावी.
३) शहरात पार्किंग झोन, रिक्षा थांबे, बस स्टॅण्ड, नो पार्किंग झोन, होकर्स झोन यांची निच्छिती करण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासना तर्फे वाहतूक व परिवहन रस्ते सुरक्षा समिती बैठक घेण्यात यावी.
४) शहरातील पथदीप (स्ट्रीट लाईट) उच्च प्रकाश क्षमतेचे सायं.७ ते सकाळी ६ पर्यंत ऑटोमॅटिक चालू बंद व्हावेत अशी यंत्रणा कार्यान्वित करावी.
५) शहरातील सर्व मुख्य रस्त्यांना रोड डिव्हाडर टाकण्यात यावे.
६) रबरी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे. डिव्हाडर व स्पीड ब्रेकर येथे रिफ्लेक्टर बसविण्यात यावे.
७) रस्ते रुंदीकरण करून साईड पट्टी विकसित करावी. वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण करावे. चौक रुंदीकरण करण्यात यावे.
८) टॉइंग व्हेव्हिकल व अतिक्रमण निर्मूलन पथक यांचे कार्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
९) शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ८ ते सायंकाळी ८ बंदी घालण्यात यावी ट्रक टर्मिनल विकसित करावे.
आपल्या शहराला सुरक्षित करण्यासाठी एकत्र येऊन लढा उभारत आहोत हा संदेश देण्यासाठी मानवी साखळी चे आयोजन करण्यात आले होते.