अजय सोनवणे
मालेगाव महापालिकेच्या महापौर ताहेरा रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महासभा वादळी चर्चेत संपन्न झाली. म्हाळदे शिवारातील आयएचएसडीपी घरकुल योजना शहरातील साफसफाई तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या मुद्द्यावर सभागृहात नागरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत जोरदार गदारोळ केला.तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झालेल्या मालेगावच्या शुटिंगबॉलपटूना महापालिकेने दहा लाख रुपये देण्याची मागणी आग्रही मागणी सदस्यांनी केली.