अजय सोनवणे
मालेगावच्या दाभाडी येथील २४ वर्षीय तरुण पंकज सुभाष मानकर या तरुणाचा निर्दयपणे हत्या करून मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण दाभाडी गाव हादरून गेले होते. या घटनेला १० दिवस उलटून देखील, मारेकऱ्यांचा तपास न लागल्याने संतप्त नागरिकांनी कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला.हजारो नागरिकांनी सहभागी होत आक्रोश व्यक्त केला.मोर्चा दरम्यान गावातील दिवे बंद करण्यात आले होते. गावातून फिरून छ.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चा आला असता मयत पंकज मानकर याच्या प्रतिमे जवळ मेणबत्ती ठेवत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तातडीने मयत पंकजचे मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.