अजय सोनवणे मालेगाव
मालेगाव सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज इमारती मध्ये सापडले दोन कोब्रा जातीचे नाग. त्यासोबत आठळली २५ ते २६ अंडी सर्प मित्र नितीन सोनवणे यांच्या टिमने पकडले. मालेगाव शहरात असलेल्या सामान्य रुग्णालया जवळ काही वर्षापूर्वी येथील परिचका आणि नर्सिंग करणा-या महिला कर्मचा-यांसाठी नूतन इमारत बांधण्यात आली. या इमारतीत नर्सिंगचे शिक्षण घेणा-या शिकाऊ महिलांचा समावेश असतो. काल दुपारच्या सुमारास एका रुम जवळ कपाटा खाली सापांची अंडी आढळून आल्याच निर्दशनात येताच सर्प मित्र नितीन सोनवणे यांना बोलवण्यात आले. त्यांच्या टिमने स्टाईल फोडून तेथे असलेल्या दोन इंडियन कोब्रा जातीच्या सर्पाना पकडले. या ठिकाणी आढळलेल्या अंड्यामध्ये काही सर्पाची अंडी ही खराब झाली तर काही चांगले असल्यामुळे ती वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. दोन्ही सापांना पकडण्यात आल्याने या इमारतीत राहणा-या स्टाफने सुटकेचा निश्वास टाकला.