मालेगाव- येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष कमलेश सोनवणे यांच्या मार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोना संक्रमानामुळे स्वतःच्या परिवारावर ओढवलेले संकट त्यामुळे आपल्या मामींना प्राण गमवावे लागले. अशा परिस्थितीत हार न मानता सचिन कैचे यांना सोबत घेऊन पुन्हा जोमाने समाजासाठी काही तरी देणे लागते या भावनेने मागील काळात आरोग्य शिबिर घेतले व आज रक्तदान व प्लाझ्मा शिबिराचे आयोजन त्यांनी केले.
संगमेश्वर येथील कै. श्रीराम सोनवणे यांच्या स्मरणार्थ साकरलेल्या उद्यानात जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
१८ वर्षावरील तरुणांनी लसीकरण करून घेण्याअगोदर रक्तदान करावे व ज्यांना कोरोना होऊन गेला अशा नागरिकांनी प्लाजमा दान करावे असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य लकी गिल यांनी केले.यावेळी सुरेश निकम, देवा पाटील, लकी गिल, हरिप्रसाद गुप्ता, सुधीर जाधव, पप्पू पाटील यांची प्रमुख उपस्थितीती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन कैचे, श्याम गांगुर्डे, सुनील शेलार, राहुल आघारकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी विनोद पवार, मदन देवरे, नवल परदेशी, योगेश पाटील, भास्कर सावकार, दिलीप पाटील, भास्कर वाणी, पप्पु अमृतकर व भागातील नागरिक उपस्थित होते. प्रतेक रक्तदात्यास एक प्रमाण पत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले.