मालेगाव – दाभाडी येथील प्रयोगशील शेतकरी महेंद्र निकम यांनी आपल्या शेतात सीडलेस हॅप्पी होम जातीचा टरबूज व पिवळ्या रंगाचा खरबुजाचे यशस्वी उत्पादन घेतले असून त्यांच्या मालाला चांगली मागणी आहे. त्यांच्या या प्रयोगाची दखल परदेशी कृषी संशोधकांनी त्यांच्या शेतात भेट देऊन पाहणी केली. पिकांबाबत माहिती घेतली. तसेच सूक्ष्म निरीक्षण करीत बारीक बारीक गोष्टींची टिप्पणी केली असून याचा अभ्यास करीत सुधातीत वाणाची निर्मिती करण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते..