मालेगाव – येथील श्री पेंढारी शैक्षणिक व सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे उद्या २३ नववधु जोडपे सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहेत. यानिमित्त आज कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यातील पारंपारिक मांडव कार्यक्रमात सहभागी होऊन समाज बांधवासोबत ढोल-ताशांच्या गजरात तीन पावली नृत्य केले.