मालेगाव:- नांदेड येथील माहेश्वरी समाजाचे प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक युवक यांची काल दिनांक ५ रोजी भरदिवसा त्यांच्या राहत्या घराजवळच काही अज्ञात गुंडांनी गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या अमानुष हत्येचा मालेगाव येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येऊन मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती माया पाटोळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मालेगाव माहेश्वरी प्रगती मंडळाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश सारडा,मालेगाव चे अध्यक्ष कल्पेश हेडा, सचिव राजेश जाखोट्या,समीर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा, महेश वरिष्ठ सभा, माहेश्वरी युवा मंच, श्री राजस्थानी मंडळ, अग्रवाल सेवा समिती, श्री राजस्थान सेवा समिती, राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ, छन्यातीय विप्र मंडळ, जनाधिकार रक्षा मंच यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,आम्ही नासिक जिल्हा माहेश्वरी महासभा, सर्व स्तरीय नागरिक ,सामाजिक संस्था ,सर्व समाजबांधव, सर्व शांतता प्रिय कायद्याचे पालन करणारे नागरिक या निवेदनाद्वारे आपल्याला विंनती करतो की दि.5 एप्रिल रोजी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते ,गरिबांचे कैवारी श्री संजय बिहानी यांची भरदिवसा रस्त्यात गोळी मारून निर्घृण पणे हत्या करण्यात आली.सदर घटनेने संपूर्ण राज्य हादरुन गेले.या घटनेचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करत असून दोषींना त्वरित अटक करुन कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून परत कोणी अशा प्रकारच्या हत्या करण्याचे धाडस करणार नाही , व संविधानाने दिलेल्या हक्कानुसार निडरपणे सर्वसामान्यांना आपलं जीवन नीट जगता येईल ,सदर घटनेचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र शब्दात निषेध करीत असून आमचे ही मागणी संबंधित सर्व अधिकारी ,महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचवुन आम्हा सर्वांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. यावेळी हरिकिशन जाखोट्या,मुरली चांडक, मधु काबरा, राधेश्याम काळा, नटवर काबरा,कमल झंवर, गोपाळ झंवर,अंकुश बडालिया, राकेश दिडवानिया,हरीश मारू, अशोक सराफ,अजय मंडावेवाला, निशांत मंत्री,सतीश कलंत्री, बंडू माहेश्वरी, नवनीत तापडिया,महेश मारू आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.