मालेगाव – रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी विविध ठिकाणी पाहणी करत सूचना देत रूट मार्च केला.
अवघ्या काही तासांवर पवित्र रमजान ईदचा सण आहे.कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाने कडक लॉकडाऊन घोषित केला आहे.सर्वत्र संचार बंदी असताना कुठेही घातलेल्या निर्बंधाना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची किनार लाभयला नको म्हणून मालेगाव येथे अधिकचा बंदोबस्त तैनात केला आहे.याच पार्श्वभूमीवर शहरातील किदवाई रोड,मोहम्मदअली रोड,भिकू चौक,नेहरू चौक, मामलेदार गल्ली,पाच कंदील,रामसेतु पुल,संगमेश्वर या परिसरात फौज फाट्यासह पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी रूट मार्च करत नागरिकांना माईक द्वारे सूचना दिल्या.तसेच ईद-उल फित्रची नमाज घरीच अदा करावी असे आवाहन मौलाना व मुस्लिम कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना केले. सर्वांनी घरात राहून पारिवारिक ईद साजरी करावी असे देखील त्यांनी नमूद केले.यावेळी मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व शहरातील पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
……