मालेगाव – मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दरेगाव शिवारात हॉटेल लबैकच्या पाठीमागे एका प्लास्टिक गोडाऊनमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. मात्र गोडाऊनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग प्लॅस्टिकमुळे भडकली व थोड्यात वेळात आगीन रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच बंबाच्या सहाय्याने शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले..