मालेगाव – शहरात विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात आज मालेगाव शहरात माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीपक्षा तर्फे विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा काढण्याबाबत बोलतांना शेख म्हणाले की, शहरात विद्युत वितरण कंपनी राजेशाही व मनमानी करत असून कंपनीकडून रात्रीच्या वेळी यंत्रमाग कारखान्यांवर छापे टाकले जाता आहे. कारखान्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करणे,नागरीकांची बिल थकल्याने त्यांच्याकडून जास्तीची दंड आकारणी करणे,नविन विद्युत कनेक्शन न देणे,चक्की व्यावसायिक,घरगुती वापरकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे यामुळ मालेगावकर नागरीक त्रस्त झाले. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.