मालेगाव – मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या स्टार हॉटेल परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेते दोन परप्रांतिय तरुण जखमी झाले आहे. हे दोघे परप्रांतिय तरुण कत्तलखान्यात काम करतात, संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर ते महामार्गावरील हॉटेल मध्ये गेले असता ही घटना घडली. पवारवाडी पोलिसात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत अबरार नावाच्या व्यक्तीला मांडीला गोळी लागली तर त्याच्या साथीदार इखलाक नावाच्या तरुण किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर सर्व जण फरार झाले. जखमींला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, दुचाकीवरुन लुटीच्या उद्देशाने आलेल्या तीन जणांनी या दोघा तरुणांकडून मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी प्रतिकार केला याचा राग आल्यामुळे गाडीवर आलेल्यापैकी ऐकाने त्यांच्या जवळील पिस्तुलातून दोघांवर गोळ्या झाडल्या. मालेगावमध्ये या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे.