मालेगाव : शहरासह तालुक्यातील काही भागात रविवारी (दि.११) वादळी वाऱ्यासह रिमझिम स्वरूपात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर असणाऱ्या नागरिकांची गोंधळ उडाला. ग्रामीण भागात सद्या उन्हाळी कांदा काढण्याचे काम कुरू आहे. त्यातच रविवारी वादळी वारे व रिमझिम पाऊस पडल्याने खळ्यावरील कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!