मालेगाव – गोकुळाष्टमी निमित्ताने साई आर्ट संस्थेचे संचालक प्रमोद आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली १० बाय १५ फुटाची रांगोळी काढण्यात आली. या ग्रुप रांगोळी साठी दिवस रात्र सलग तब्बल ७२ तास लागले. २७ ते २८ किलो रांगोळीचा वापर झाला. यात विशेष पिगमेंट व लेक रंगांचा मिश्रण करण्यात आले होते, हे रासायनिक रंग रु.१२० चे १०० ग्रॅम स्वरूपात मिळतात असे या कलाकरांनी सांगितले. ही रांगोळी काढणा-या टीममध्ये मोनाली बच्छाव, कल्याणी बागुलईशा बागुल, भाग्यश्री निकम, रितल महाजन, आंचल आर्वी (माळी), प्राची माळी, प्रतीक्षा देवरे,करीना सूर्यवंशी, वैशाली खैरनार,भाग्यश्री पाटील,अंकिता जगनाडे, तेजस्वीनी बावणे, प्रशांत आर्वी (माळी) जयेश सैंदाने, तेजस माळी, या कलाकारांचा समावेश होता.