नाशिक – मालेगाव मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. येथे सुरु असलेल्या अनाधिकृत पणे सुरू असलेला बायोडिझेल पंपावर छापा टाका टाकला आहे. एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या नातेवाईकांचा हा पंप होता.त्याचे काका हा अनधिकृत पंप चालवत होते. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केली असून त्यांनी ही माहिती दिली आहे. हा अनाधिकृत पंप चालवणा-या आरोपीने मालकीच्या हॉटेल मागे पत्र्याच्या शेड मध्ये हा पंप उभा अनाधिकृतपणे उभा केला होता. पंपावर मिळणाऱ्या डिझेल पेक्षा १५ ते २० रुपये कमी दराने तो हे बायोडिझेल विकले जात होते.
मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे अनेक व्यवसाय सुरु आहे. त्यात बायोडिझेल विकण्याचा नवा धंदा आता सुरु झाला असून पोलिसांनी आता या अनाधिकृत पंपाकडे आपले लक्ष वळवले असून पहिली मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सुरु असलेल्या या अनाधिकृत व्यवसायाला आता जरब बसणार आहे.