मालेगाव: मालेगाव तालुक्यातील चार आरोपीचे हद्दपारिचे आदेश निर्गमित केल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी दिली आहे. २३ जून २०२१ रोजीच्या आदेशानुसार हद्दपारीचे आदेश पारित करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक छावणी पोलीस स्टेशन मालेगाव यांनी प्रदीप ऊर्फ जांग्या बापू सुर्यंवशी, देवा दादाजी मेहंदळे, टेहरे ता. मालेगाव जि. नाशिक तर पोलीस निरीक्षक मालेगाव शहर यांनी मोहमद अतहर मोहमद अकील, मुस्लिम नगर मालेगाव, मोहमद मुर्तुझा अब्दुल रशिद, कमालपुरा, मालेगाव, यांचे विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (ब) नुसार हद्दपारीचा प्रस्ताव अपर पोलीस अधिक्षक, मालेगाव यांचेमार्फत उप विभागीय दंडाधिकारी, मालेगाव यांना पोलीस निरीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांचे मार्फत सादर करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव शहर यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रदीप ऊर्फे जांग्या बापू सुर्यवंशी व देवा दादाजी मेहंदळे, टेहरे यांना नाशिक जिल्हयातून तसेच सरहद्दीवर असलेल्या धुळे, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्हयातून दोन वर्षे, तर मोहमद मुर्तुझा अब्दुल रशिद रा. कमालपुरा, मालेगाव यास नाशिक जिल्हयातून तसेच नाशिक जिल्हयाच्या सरह्दीवर असलेल्या धुळे, जळगाव, नंदुरबार, व अहमदनगर जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी कळविले आहे.