मालेगाव: समाजातील गोरगरीब व वंचितांना मदतीचा हात देऊन सातत्याने समाजाभिमुख कार्य अनेक घटक करतात. कोविड काळात अनेक लेकरे अनाथ झाली. येथील पंचगंगा उदयोग समुह व रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक तथा मामको संचालक रवींद्र दशपुते यांच्या वाढदिवसा निमित्ताने तालुक्यातील निराधार शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी रवींद्र दशपुते, पंचायत समिती सदस्य अरूण पाटील, रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष राजेंद्र दिघे, सचिव सुमित बच्छाव, प्रकल्प संयोजक विलास सोनजे, बन्सीलाल कांकरिया, मयुर दशपुते, निखिल दशपुते, रवींद्र शिरोडे, प्रकाश शेवाळे उपस्थित होते. यावेळी बोलताना अरूण पाटील म्हणाले, संस्कारशील भावना रुजलेल्या शेतकरी कुटुंबातुन उद्योजक झालेल्या या परिवाराची समाजातील निराधारांना मदतीची ही भावना अनुकरणीय आहे. उद्योग, व्यावसायिकांना वेगळा आदर्श निर्माण केला आहे. दिघे यांनी दशपुते परिवाराच्या आदिवासी, वंचितांच्या शैक्षणिक मदतीच्या सातत्याचा गौरव केला. गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
दशपुते म्हणाले, तळागाळातील घटकांच्यासाठी रोटरी कार्य करते. अशा शैक्षणिक व सामाजिक प्रकल्पांसाठी आपल्या परिवाराचे योगदान कायम असेल. निराधारांना मदतीचा हात या प्रकल्पांतर्गत शहर व तालुक्यातील पहिली ते दहावीतील २७ विदयार्थ्यांना वर्षभराचे शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, दोन रंगीत ड्रेससाठी प्रत्येकी हजार रुपयांचे व्हॉउचर देण्यात आले. प्रास्ताविक विलास सोनजे यांनी तर सुत्रसंचालन सुमित बच्छाव तर भाग्येश वैदय यांनी आभार मानले. या प्रकल्पासाठी रवींद्र शिरोडे, प्रकाश शेवाळे, प्रशांत पाटील, मनोज बच्छाव, राहुल डवाळकर , चिरंजीव सानप यांनी पुढाकार घेतला.
……
मदतीचा हात दिलेले विद्यार्थी:
रेणुका कुवर, मार्कंड कुवर, गायत्री सोनवणे, हितेश पवार, धिरज सानप, निर्मल अहिरे, पुर्वी सुरंजे, गौरी सुरंजे, कल्याणी सोज्वळ, फैजिया अन्सारी, ऋषिकेश कापडणीस, धनंजय तापडे, पुजा मानकर, रुपाली सानप, गौरी शेलार, चिन्मय मानकर, वैष्णवी गायकवाड, उदय गायकवाड, गायत्री निकम, अश्वजीत सोनवणे, तेजस निकम, हर्षदा सोनवणे, मयूर सोनवणे, वैष्णवी मराठे, जयश्री मराठे, निखिल पाटील, विकी सानप.