मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालेगाव येथे बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकाला अटक करण्यात आली. पवार वाडी आणि छावणी पोलिस ठाण्यात या अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल होता. मंगळवारी ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती.
२७ जुलै २०२५ रोजी पवार पोलिस ठाण्यात शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक प्रवीण श्रीधर पाटील, कार्यालयीन अधीक्षक सुधीर भास्कर पगार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तर १३ एप्रिलला छावणी पोलिस ठाण्यात उपशिक्षण अधिकारी उद्य विठ्ठलराव देवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २७ जुलै रोजी पवारवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने
केलेल्या तपासात मालेगाव हायस्कूलमधील बॅक डेटेड शिक्षक भरती प्रकरणात अंजूमन तुलबा संस्थेच्या १३ शिक्षकांच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीधर पाटील आणि कार्यालयीन अधीक्षक सुधीर भास्करराव पगार यांना अट्क केली. य.ना.जावध फुले शिक्षण संस्था संगमेश्वरच्या ११ शिक्षकांच्या भरती घोटाळयात उपशिक्षण अधिकारी उदय विठ्ठलराव देवरे यांना अटक केली.