मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालेगावमध्ये एका व्यक्तींनी आपल्या चार वर्षीय मुलीला गिराणा नदीच्या वाहत्या पाण्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने स्वत:ही पाण्यात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मालेगाव परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. टेहरे चौफुलीवर गिराणा नदीपात्राजवळ ही घटना घडली.
या घटनेनंतर स्थानिक तरुणांनी गिरणा नदीपात्रामध्ये उड्या मारत मुलीसह तिच्या बापाला वाचवले. मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी मुलीच्या बापाला ताब्यात घेतले आहे.
कौटुंबिक वादातून बापाने मुलीला नदीपात्रात फेकल्याची माहिती समोर आली आहे. मुलीकडे घरात लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.