मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी चंद्रकांत शेवाळे आणि उपसभापतीपदी सौ. अरुणाताई सोनजकर यांची बिनविरोध निवड झाली.
एकूण १४ संचालकांच्या पाठिंब्याने सभापती आणि उपसभापती यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर शिवसेना संपर्क कार्यालयात सर्व संचालक मंडळ, सभापती, उपसभापती यांचा सत्कार केला. यावेळी माजी सभापती श्री. विनोद चव्हाण, श्री. भिका कोतकर, श्री. रवींद्र निकम, श्री. रवींद्र साळुंखे, श्री. संदीप पवार, डॉ. इंगळे, श्री. राजेंद्र पवार, श्री. संजय घोडके, सौ. मीनाक्षीताई देवरे, श्री. सुभाष सूर्यवंशी, सौ. रत्नाताई पगार तसेच शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उपस्थितीत होते.
कामकाजात आमूलाग्र बदल होईल – दादा भुसे
या ऐतिहासिक विजयामुळे बाजार समितीच्या कामकाजात आमूलाग्र बदल होईल अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर, अत्याधुनिक सुविधांची उभारणी, पारदर्शक व्यवहार आणि शेतकरी हिताचे निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वाखाली घेतले जातील. शिवसेनेचा झेंडा मालेगावच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात अशीच उंच फडकत राहील. या विजयाचे श्रेय तमाम शिवसैनिकांच्या एकजुटीला जाते. यासाठी सर्व शिवसैनिक आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार!