मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस बाकी असतांना दुसरीकडे मात्र राजकीय नेत्यांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर आल्या आहे. मालेगावमध्ये असाच एक हल्ला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अद्वय हिरे बचावले आहेत. त्यांनी या घटनेची पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.
अव्दय हिरे मालेगावातील एका कार्यकर्त्यांच्या घरी गेले असता बाहेरुन काही गुंडांनी त्यांच्यावर दगडफेक आणि धमकावल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेनंतर अव्दय हिरे यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पालकमंत्री गुंड आहे, ते पराभवाच्या भयाने माझी हत्या करायला मागे – पुढे पाहणार नाही. जर माझ्या जीवाला काय झालं तर ही जबाबदारी पालकमंत्र्याची आणि महाराष्ट्राची आहे. मला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.