मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील इसलमाबाद परिसरात राहणाऱ्या मोहम्मद लुकमान यांचे कुटुंब रात्री झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी खिडकीतून अॅसिड फेकले. त्यामुळे संपूर्ण घरात धूर निर्माण झाला यात तरुणीसह तिचे वडील व आई जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. हे अॅसिड कोणी व का फेकले याचा पोलीस तपास करीत असून अॅसिड फेकणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.