नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एक महिन्याच्या उपवासानंतर आज ईद अल फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. नाशिकच्या मालेगाव येथील मुख्य ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत सामुहिक नमाज अदा केली. मौलाना मुफ्ती ईस्माइल यांनी ईदची नमाज सर्वांना पढवली. ईद निमित्त मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्य इदगाह मैदाना व्यतिरिक्त शहरातील ७ ठिकाणी नमाज पठण झाले, नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.