मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील जेष्ठ पत्रकार, कवी नाना महाजन यांचे सायंकाळी निधन झाले. महाजन हे परखड पत्रकार म्हणून ओळखले जात, अनेक वृत्तपत्रात त्यांनी आपल्या कामातून छाप उमटवली होती. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी आपले स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले होते. अचानक त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पत्रकारांमध्ये शोक पसरला आहे.
नाना महाजन हे अहिराणी भाषिक कवी असल्याने त्यांच्या अहिराणी भाषेतील कविता अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. पत्रकारितेतील एक अनेक जुने स्तंभ आज निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. यावर्षी नाशिक येथील वसंत व्याख्यानमालेत त्यांनी कवी संमेलनात सहभाग घेतला होता.