मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गुरुवारी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी कार्यकर्त्यांसह जुन्या आग्रा महामार्गावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या प्रश्नी रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान महापालिका आयुक्त तेथे पोहचल्यावर जमावाच्या रोष वाढला आणि त्यातील एका कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर चहा व पाणी फेकल्याची घटना घडली होती. एका सरकारी अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्याना व्यक्तीवर कारवाई करावी यासाठी आज महापालिकेच्या उपआयुक्तसह सर्वच अधिकारी व आणि कर्मचाऱ्यांनी पेनबंद आंदोलन पुकारत घडलेल्या घटनेचा निषेध करत सर्व जण पालिका इमारती खाली जमा होत मोर्चा काढला. यावेळी पोलिसांना निवेदन देत संबंधितांवर कारवाई करून अटकेची मागणी महापालिका कर्मचाऱ्यांनी केली.