अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव मनपा विरोधात रस्त्यावरील खड्ड्यात झाड लावून निषेध आंदोलन आज करण्यात आले.
मालेगाव शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र मनपा त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करीत मालेगाव नागरी सुविधा समितीच्या वतीने रामसेतू पुला जवळील रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करुन मनपाचा निषेध केला. मुख्यमंत्री जेव्हा मालेगाव शहरात येणार होते त्या वेळी रात्रीतून मनपा प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी केली, रंगरंगोटी केली मग शहरातील रस्ते महाराष्ट्रात येत नाही का, मग हे रस्ते का तयार केले जात नाही असा सवाल समितीने केला आहे.