मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अव्दैय हिरे यांची शिवसेना ठाकरे गटात एन्ट्री होताच मालेगावामध्ये राजकारण तापले आहे. पालकमंत्री दादा भुसे पोलीस यंत्रणेवर दबाव आणून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र करीत असल्याचा आरोप करीत हिरे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले. पालकमंत्र्यांमुळे मालेगाव शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या गुंडांकडून होणाऱ्या हल्ल्यातील गुन्हेगारांवर कड्क कारवाई करावी पालकमंत्र्यांच्या दडपशाहीला आळा घालावा अशी मागणी आंदोलकांच्यावतीने करण्यात आली .आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.