मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मित्राला दिलेला शब्द पूर्ण करण्यात वेगळाच आनंद असतो. अशीच एक घटना येथे घडली आहे. आदिवासी मित्राच्या मुलीची इच्छा एका मित्राने पूर्ण केली आहे. आणि त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ही काही किरकोळ इच्छा नव्हती तर थेट हवाई प्रवासाची होती.
येथील बाराबलुतेदार संघटनेचे संस्थापक व दानशूर व्यक्ती बंडू बच्छाव यांनी आदिवासी मित्राच्या मुलीची इच्छा पूर्ण केली. बच्छाव यांनी थेट नवरदेव आणि नवरीला हेलिकॅप्टर मधून लग्नमंडपात आणले. तसेच, त्यांची हेलिपॅडवरून वाजत गाजत घोडा गाडीतून वरात काढण्यात आली. मित्राला दिलेला शब्द पूर्ण करुन बच्छाव यांनी आपली घट्ट मैत्री दाखवून दिली आहे. तसेच, या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
हेलिपॅडवरून नवरदेव-नवरीची वरात लग्नस्थळी पोहचली. लग्न सोहळा आटोपून पुन्हा तिची बिदाई हेलिकॅप्टर मधूनच करण्यात आली. विशेष म्हणजे हेलिकॅप्टर मध्ये धर्मगुरुसुध्दा त्यांच्या समवेत होते. सर्वधर्म समभाव सांभाळत हे सारे संपन्न झाले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बाराबलुतेदार संघटनेच्या माध्यमातून आज झालेल्या या विवाह सोहळ्याची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.
Malegaon Helicopter Bride Groom Entry