मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शहरातील गिरणा नदीला सध्या पाणी असून नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आलेला असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी अडविले जाते. त्यामुळे शहरातील अनेक तरुण पोहण्यासाठी तेथे जातात. मात्र अनेक जण बंधा-यावरुन पाण्यात उड्या मारतांना स्टंट करतात. त्यामुळे अनेक दुर्घटना यापुर्वी घडल्या आहेत.
अनेक तरुण स्टंटबाजी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. महापालिका प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्याकडे कोणी लक्ष देत नाही. केटीवेअर बंधा-यावर सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी करण्यात येत आहे. तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.