सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या मालेगाव शहरातील साई आर्टच्या कलाकारांनी सलग १२२ तास १४ कलाकारांनी दिवस रात्र जागत १० बाय १६ फुटाची भव्य अशी गणेशाची रांगोळी साकारली आहे. या रांगोळीमध्ये लेक कलर व पिगमेंट कलर रंगाचा वापर करण्यात आला असून उद्या पासून तीन दिवस या रांगोळीचे प्रदर्शन मालेगावकरांना पहावयास मिळणार आहे. महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने नागरीक प्लॅस्टर ऑफ पॅरीसची मुर्ती घरी आणतात. त्या मुर्ती साठी जे रंग वापरले ते विषारी असतात. विसर्जना वेळी ते जेथे बुडविले जातात त्यामुळे पर्यावरणाची हानी होते आणि त्याचा मानवी जीवनावर घातक परिणाम होतो. त्याच बरोबर अन्य घटकांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो ह्याच थिम वर ही रांगोळी साकारण्यात आली आहे. गणेश भक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती टाळाव्या हा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून या कलाकारांनी दिला आहे.