मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये १०० कोटींच्या मनी लाँड्रिंगचा मुख्य सूत्रधार महमूद भगड हा देश सोडून पळून गेल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहे. ईडीला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महमूद भगड असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी भगड विरोधात कारवाई करण्याची तयारी सुरु केली होती. याची माहिती लागताच भगड देश सोडून गेला. महमूद भगड हा चॅंलेजर किंग या नावाने प्रसिध्द आहे. त्याच्या विरोधात ईडीकडून आता लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. महमूद भगड हा मूळचा गुजरातचा आहे.
मालेगावी मनी लाँडरिंग प्रकरणातील आणखी एक आरोपी सिराज मोहम्मदला ईडीने अटक केली होती. त्याच्याकडून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर ईडीने कारवाई करण्याची तयारी सुरु करताच महमूद भगड याने देश सोडला.
सिराज मोहम्मदवार १४ बानावट बँक खाती उघडण्याच्या आणि भारतभरात २१ अतिरिक्त खात्यांव्दारे निधीच्या हेराफेरीचा आरोप आहे. ईडीने भागड विरुध्द लूकआऊट नोटीस जारी केली आहे आणि त्याच्या मनी ट्रेल फूटप्रिंटची चौकशी करण्यात येत आहे.