अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहर सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव महानगरपालिकेच्या निषेधार्थ सरदार चौकात भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील पडलेले खड्डे, शहरात पसरले चिखलाचे साम्राज्य, तुंबले ल्या गटारी, पाईप लाईन लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे दूषित पाणी पुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंगू मलेरिया चिकन गुणिया डायरिया वैगरे साथीचे आजार वाढत आहे. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन देखील मनपा प्रशासन दखल घेत नाही, आयुक्त नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वारस्य दाखवत नाही याच्या निषेधार्थ येथील सरदार चौक येथे भरपावसात जमिनीवर ठिय्या मांडून धरणे आंदोलन करण्यात आले.
मनपाच्या वतीने नागरिक समस्याचे निराकरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत समस्यांनाचा पंचनामा करत जनजागृती करण्यासाठी धरणे आंदोलन शहरातील विविध भागात व चौकाचौकात करण्यात येणार असल्याचे समितीचे रामदास बोरसे व आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार यांनी सांगितले आहे.
नागरी सुविधा समितीचे रामदास बोरसे, भरत पाटील, कैलास शर्मा, निखिल पवार, देवा पाटील, मुरलीधर पाटकर, चेतन असेंरी, निकेतन प्रमाणे, शिवाजी चित्ते, बाबाजी आहिरे, प्रीतम ठाकरे, बंटी सूर्यवंशी, गणी शाह, क्रांती पाटील, राकेश भुसे. इस्माईल बांगडीवाले, फारुख भाई कच्ची, महमूद अन्सारी, कैलास गुप्ता, नरेंद्र साकला, बाजारपेठेतील सर्व व्यापारी उपस्थित होते.