अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव बाह्यचे आमदार दादाजी भुसे यांनी तिसऱ्या वेळेस मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर मालेगाव येथे दादाजी भुसे समर्थक शिवसैनिकांनी मोसम पूल चौकात फटाके फोडून, पेढे वाटप करत जल्लोष केला.. दादा भुसे यांच्या कारकीर्द विषयी थोडे जाणून घेऊया
दादाजी दगडू भुसे ..
– जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात
– आनंद दिघेंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राजकारण आले
– २००४ ला राजकीय कारकीर्दीला सुरुवात
– २००४ – मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून विजयी नंतर शिवसेनेत प्रवेश
– २००४, २००९, २०१४ व २०१९ सलग चार पंचवार्षिक मालेगाव बाह्य मतदारसंघात विजयी
– २०१४ – सेना भाजप युती सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री, सहकार राज्यमंत्रीपद भूषविले
– २०१९ – महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्रीपद सांभाळले.
– २०२२- एकनाथ शिंदे बंडानंतर शिंदे गटात सामील
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दादा भुसे यांचे मित्रत्व नाते
– मुख्यमंत्री शिंदेंच्या राज्यातील दौ-याची सुरुवात अलीकडे मालेगावातून केली.