मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कालीकुट्टी भागात पाचशे रुपये उसने न दिल्याच्या रागातून तीन जणांना तैशिफ शेख शकील याच्या गळ्यावर कटरने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अगदी किरकोळ कारण्यासाठी थेट प्राणघातक हल्ला होण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तैशिफ व त्याचे मित्र उभे असतांना तिघे जण तेथे आले आणि त्यांनी ५०० रुपये उसने मागितले. हे पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने त्याच्या गळ्यावर कटरने वार केले तर दोघांनी जबर मारहाण केली. या घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत तैशिफ सीटी पोलिसात दाखल झाला. या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहेय त्यात मालेगावमधील गुन्हेगारी पुन्हा समोर आली आहे. तौशिफवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.