मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये दोघांनी दुचाकीवर फिरत चाकूचा धाक दाखवीत लूटमार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे लूटमारीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहे. सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी एकाला शिताफीने अटक केली तर एकाचा पोलीस शोध घेत आहे.
या चोरट्यांनी तिघांचे मोबाईल व रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. मोहम्मद व भुऱ्या नामक चोर रात्रीच्या वेळी दुचाकीवरून फिरत त्यांनी हॉटेल, किदवाई रोड व इस्लामपुरा भागात तिघांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार केली. या घटनेने नागरिकांत घबराट पसरली.