मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील दहिवाळ, चिंचगव्हाण, पाडळदे या ठिकाणी एकाच रात्रीतून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने असा जवळपास १६ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. रात्रीच्या वेळी बंद असलेली घरे चोरट्यांनी हेरली. या घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार ठिकाणी चो-या केल्या. एका घरातील कुटुंबिय हे गच्चीवर झोपलेले होते. ही बाब पाहून चोरट्यांनी याच घरात खालच्या रुममध्ये घुसून चोरी केली. चोरी करण्यासाठी आलेले चौघे चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. मालेगाव तालुका पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणचे पंचनामे करुन सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरु केला आहे.