मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील पवारवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील काही जण दरोडा टाकणार असल्याची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक तेगबिरसिंह संधून यांच्या पथकाने सापळा रचत हजार खोली भागात छापा मारत पाच जणांना ताब्यात घेतले तर त्यातील दोन जण फरार झाले.
या टोळीकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल ४ जीवंत काडकूस व दोन तलवारी जप्त केल्या आहेत. यातील चार जणांनावर विविध प्रकारचे गुन्हे नोंद असून फरार झालेल्या दोघांचा पोलिस शोध घेत आहे. मालेगाव शहराबरोबरच चोरट्यांनी ग्रामीण भागातही धुमाकूळ घातला आहे. जुलै महिन्यात येथील पाडळदे येथे रात्री एका ज्वेलर्सचे दुकान फोडून त्यातून सोन्याचांदीचे दागिने चोरले. याच माहिन्यात मालेगावात पावरलुम कारखान्यातून २७ लाख चोरीला गेले. याबरोबरच अनेक चो-या व घरफोडीचे सत्र सुरु आहे. अशात हे दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून मालेगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या चो-या वाढलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.
तलवार, चॉपर, कोयता या हत्यारांसह तरुणाला अटक
शहरातील पवारवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुलशेर नगर मध्ये मोहम्मद अमीन नामक या तरुणांच्या घरी पोलिस इपअधिक्षक तेगबिर सिंह संधू यांच्या पथकाने छापा टाकत तलवार, चॉपर,कोयता अशी हत्यारे जप्त करुन तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ही हत्यारे त्याने कोठून व कशासाठी आणले याचा पोलिस तपास करीत आहे. मालेगाव शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून त्यात हत्यारे बाळगणा-या तरुणाला अटक झाल्यामुळे पोलिसांनी याचा कसून शोध सुरु केला आहे.
मालेगाव शहर हे संवेदनशील आहे. त्यामुळे या तलवारी, चॅापर व कोयता कशासाठी आणल्या हा प्रश्न आहे. जानेवारी महिन्यात याच भागात अजमेर येथून आलेल्या धारदार तलवारी, कुकरी, गुप्त्या असा शस्त्र साठा जप्त केला होता. अजमेर येथून हा शस्त्र साठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पवारवाडी पोलिसांनी म्हाळदे शिवारातील ब्रीज जवळ सापळा रचत परवेज आलम जमालुद्दीन या १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्या जवळील ८ तलवारी,५ कुकरी, ८ गुप्त्या, १० रॅम्बो चाकू अशी वेगवेगळी हत्यार जप्त करण्यात आली होती. आता याच भागात तलवार, चॉपर,कोयता अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे.
malegaon crime police arrest 5 suspect dacoity
nashik district rural