मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहराबरोबरच चोरट्यांनी ग्रामीण भागातही धुमाकूळ घातला आहे. येथील पाडळदे येथे रात्री एका ज्वेलर्सचे दुकान फोडून त्यातून सोन्याचांदीचे दागिने चोरले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरु केला आहे.
गेल्या काही दिवसापासून मालेगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. येथे चो-यांचे प्रमाण कमी होत नसतांना चोरट्यांनी ग्रामीण भागाला लक्ष केले आहे. या चोरीच्या वाढलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे. या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाडळदे येथे फोडलेल्या या ज्वेलर्सचे दुकानातून किती सोन्याचांदीचे दागिने चोरीला गेले. त्याची किंमत काय होती याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण, ज्वेलर्सला लक्ष करुन चोरट्यांनी चोरी केल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंता आहे. ज्वेलर्समध्ये अनेक सुरक्षिततेचे उपाय केलेले असता. असे असतांना चोरट्यांनी हे ज्वेलर्स फोडून चोरी केली.