शनिवार, ऑगस्ट 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुप्तधनासाठी ९ वर्षांच्या बालकाचा नरबळी… मालेगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

by Gautam Sancheti
जुलै 22, 2023 | 7:22 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुप्तधनासाठी ९ वर्षीय बालकाचा नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून १ जण फरार आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील पोहाणे येथील नऊ वर्षीय बालकाची हत्या झाल्याचे आणि मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कृष्णा सोनवणे (९) असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे. दरम्यान, पोलीसांनी या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले. गुप्तधनाच्या लालसेतुन हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जंगलात पुरला मृतदेह
कृष्णाचे वडील अनिल सोनवणे हे पोहाणे शिवारात वनखात्याने दिलेल्या जमिनीत वास्तव्यास आहेत. गेल्या रविवारी दुपारी कृष्णा दोघा मित्रांसह घराशेजारी खेळत होता. काही वेळानंतर कृष्णा एका मित्रासह तेथून दुसरीकडे निघून गेला. त्यानंतर सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. मात्र त्याचा तपास लागू शकला नाही. तेव्हा त्याचे अपहरण झाले असल्याची तक्रार वडनेर-खाकुर्डी पोलिसात देण्यात आली. त्याचा शोध सुरु असतानाच गुरुवारी पोहाणे शिवारातील जंगलात एके ठिकाणी त्याचा मृतदेह पुरुन ठेवल्याचे गावकऱ्यांना आढळून आले.

डोक्यावरचे केस काढले
या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी धुळ्याच्या वैद्यकीय रुग्णालयात पाठवला. या बालकाचा गळा चिरलेला तसेच मृतदेहासोबत एक चाकूही पुरुन ठेवल्याचे आढळून आले. त्यामुळे कृष्णाची हत्या करुन मृतदेह पुरुन ठेवला असण्याचा पोलिसांचा कयास होता. कृष्णा हा अमावस्येच्या दिवशी बेपत्ता झाला होता. त्याच्या डोक्यावरचे केसही काढल्याचे आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असण्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक, ठसेतज्ज्ञ तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी पाच पथके गठित केली.

असे सापडले चौघे
घटनास्थळावर पुरण्यात आलेल्या वस्तू आणि श्वान पथकाने घेतलेला माग यातून आरोपी पोहणे गावातील असल्याचे लक्षात आले. वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने पोलीसांनी उमाजी मोरे (४२, रा. पोहाणे) याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने रोमा मोरे २५ , रमेश सोनवणे २१, गणेश सोनवणे १९ , लक्ष्मण सोनवणे ४५ यांच्या मदतीने हा गुन्हा केला. लक्ष्मण सोनवणे फरार आहे. हा प्रकार गुप्तधनाच्या लालसेपोटी झाला असून आरोपीनी मुलाला जीवे ठार मारले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.

दरम्यान, तपासी पथकाला बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. कृष्णा मृत्यू प्रकरणात तपास पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी घेतली आहे. या पथकास १५ हजार रुपयांचे बक्षीस अधिक्षकांनी जाहिर केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जलज शर्मा यांनी स्वीकारला नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

Next Post

आईला घेण्यासाठी येत होता… रस्ते अपघातात मुलाचा मृत्यू… नाशिकच्या द्वारका येथील घटना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Gzl81fKWwAE3m6S 1920x1091 1
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन….

ऑगस्ट 30, 2025
Untitled 49
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांची शिंदे समितीने घेतली भेट…झाली ही चर्चा

ऑगस्ट 30, 2025
crime1
क्राईम डायरी

जुन्या वादातून तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तरुण जखमी…गुन्हा दाखल

ऑगस्ट 30, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
महत्त्वाच्या बातम्या

गेल्यावेळेस प्रश्न सोडवला होता ना, मग परत मराठा आंदोलन का? एकनाथ शिंदे यांना विचारा….राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

ऑगस्ट 30, 2025
Untitled 48
राज्य

महाराष्ट्राचा विविध कंपन्यांशी १७ सामंजस्य करार…३४ हजार कोटींचा गुंतवणूक, ३३ हजार रोजगार निर्मिती

ऑगस्ट 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
महत्त्वाच्या बातम्या

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 30, 2025
rape2
इतर

लग्नाचे आमिष दाखवत रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑगस्ट 30, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

घरच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे शासनाच्या या पोर्टलवर अपलोड करा…सांस्कृतिक मंत्र्याचे आवाहन

ऑगस्ट 30, 2025
Next Post
accident 2

आईला घेण्यासाठी येत होता... रस्ते अपघातात मुलाचा मृत्यू... नाशिकच्या द्वारका येथील घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011