सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहर पोलिस स्टेशनच्या समोरच जखमी अवस्थेत पडलेल्या पक्षाचे प्राण शहर पोलिसांनी वाचवले असून जखमी पक्षावर औषध उपचार करून पक्षाला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या समोरच एक बगळा पक्षी जखमी अचानक खाली पडला हे येथील पोलिसांनी बघितले. त्यानंतर पोलिसांनी या पक्षाला पोलिस चौकीमध्ये नेऊन पाणी पाजले. त्यानंतर या पक्षाला उपचारासाठी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांच्याकडे पोलिस घेऊन गेले. या पक्षावर उपचार सुरु असतांना ही माहिती पोलिसांनी वनविभागाला देऊन त्यांच्या स्वाधीन केले. शहर पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे जखमी बगळ्याचे प्राण वाचले असल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.