अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरातील जुन्या आग्रा महामार्गावर संध्याकाळच्या सुमारास बस व रिक्षा यांच्यात अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह एक जण जखमी झाला आहे. या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले, मात्र तेही अपूर्ण आहे. त्यामुळे सातत्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आबे. त्यातूनच हा अपघात झाल्याचे बोलल जात आहे. अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात रिक्षा गेली. सुदैवाने ती पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान अपघातानंतर जखमींना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बघा या अपघाताचा हा व्हिडिओ
Malegaon bus and rikshaw accident 2 injured City