मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ मालेगाव बंदची हाक देण्यात आली. हिंदुत्ववादी संघटना सर्व पक्ष बंदमध्ये सहभागी होणार आहे. विशेष करून मालेगावच्या हिंदू बहुल पश्चिम पट्ट्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेर गाववरूनही अधिकची कुमक मागविण्यात आली आहे.