मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. हिरे स्वतः सोसायटी गटातून उमेवारी करत आहेत. जनतेची साथ मोठी आहे. सर्वसामान्य मतदार आमच्या सोबत आहे. दडपशाही व दादगिरीला मतदार भीक घालणार नाही मतदारांमध्ये चांगला उत्साह आहे.
मालेगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व जागांवर विजयी होतील व जिल्ह्यातही महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल अशी आशा अद्वय हिरे यांनी मतदानानंतर व्यक्त केली. मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे व ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनेलमध्ये चुरशीची लढत आहे..
Malegaon APMC Election Dada Bhuse Advay Hire Panel Fight Politics