मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाणीपुरवठ्यात अनिमियतता होत असल्यामुळे मालेगावध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महिलांनी हंडे फेकले. तालुक्यातील दहिवाळसह माळमाथ्यावरील २६ गावांना गिरणा धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यात अनियमितता होत असल्याने महिलांनी हंडा मोर्चा काढला होता. पण, हा मोर्चा कार्यालयाच्या बाहेर अडविण्यात आल्याने संतप्त महिलांनी कार्यालयाच्या आवारात हंडे फेकले.
जो पर्यंत अप्पर जिल्हाधिकारी निवेदन घ्यायला येत नाही तो पर्यंत धरणे धरण्याची भूमिका मोर्चेक-यांनी घेतली. त्यानंतर लवकरच पाणी प्रश्न सोडविला जाईल असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
पाण्यासाठी नागरीकांना व महिलांना भटकंती करावी लागत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करावा सुधारित योजनेचे काम तातडीने मार्गा लावावे यासाठी या गावातील महिलांनी,नागरिकांनी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा हंडा मोर्चा काढला होता.