मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या कामगार विरोधी व खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ मालेगावमध्ये पोस्टाचे कर्मचारी आक्रमक झाले आहे. आता पोस्टाचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याने ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनतर्फे तर्फे एक दिवसीय देशव्यापी संप पाळण्यात आला. युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी मालेगावच्या मुख्य पोस्ट कार्यालयासमोर जमत जोरदार घोषणाबाजी करीत खासगीकारणाचा निषेध केला. संपामुळे पोस्टाच्या कामावर परिणाम पाहायला मिळाला.