गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असे आहे मालाडचे जम्बो कोविड सेंटर; मुख्यमंत्र्यांनी केले उदघाटन

जून 28, 2021 | 10:56 am
in राज्य
0
cm covid meeting1 1140x570 1

विशेष प्रतिनिधी, मुंबई
तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण आज मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस के श्रीनिवासन उपस्थित होते.
cm covid meeting
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस् रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल.
पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दररोज 15 लाख लसी देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
प्रारंभी महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले.
cm covid meeting2
मालाडच्या कोविड जम्बो कोविड सेंटर व इतर माहिती
  • या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कोविड सेंटर्समधील बेडची संख्या वाढवण्यासोबतच चार नवीन कोविड सेंटरही सुरु करणार.
  • त्यापैकीच एक म्हणजे मालाड जम्बो कोविड सेंटर होय. या सेंटरमध्ये २१७० बेडस् आहेत. त्यात जवळपास ७० टक्के म्हणजे १,५३६ ऑक्सिजन बेड तर १९० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी २०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि ५० पेडियाट्रिक आयसीयू बेड आहेत.
  • मालाड जम्बोसह दुसऱ्या टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स हे नवीन जम्बो सेंटर देखील आपण सुरु करत आहोत. तर नेस्को, रिचर्डसन ॲण्ड क्रूडास भायखळा आणि एनएससीआय मधील बेडची संख्या वाढवली जात आहे.
  • जम्बो कोविड सेंटर्सच्या दुसऱ्‍या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक म्हणजे ८,३२० इतके बेड उपलब्ध होत आहेत. यात ७० टक्के म्हणजे ५,९८६ ऑक्सिजन बेड तर १,१४० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र असे ६०० ऑक्सिजन व १५० आयसीयू बेड आहेत.
  • पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे मिळून जम्बो कोविड सेंटर्समधील एकूण बेड संख्या आता १५ हजार ६२७ होते आहे. त्यात ९,१९३ ऑक्सिजन बेड, १,५७२ आयसीयू बेड आहेत.
  • यामध्ये लहान मुलांसाठी एकूण १,२०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि १५० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील.
  • जम्बो सेंटर्सच्या दुसऱ्‍या टप्प्यामध्ये आपण ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि पेडियाट्रिक बेडची संख्या अधिकाधिक असेल, यावर भर दिला आहे.
  • जम्बो सेंटर्सच्या संख्येमध्ये जर आपण महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांची बेरीज केली तर आता एकूण बेड्सची संख्या ही १९ हजार ९२८ म्हणजे जवळपास २० हजार इतकी होते आहे.
  • पहिल्या व दुसऱ्‍या लाटेमध्ये मिळून आतापर्यंत सुमारे ७७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार
  • जम्बो कोविड सेंटर्सच्या पहिल्या टप्प्यामध्ये बीकेसी कोविड सेंटर, गोरेगाव नेस्को कोविड सेंटर, वरळी एनएससीआय संकूल, मुलूंड रिचर्डसन ॲण्ड क्रूडास, भायखळा रिचर्डसन ॲण्ड क्रूडास आणि दहिसर जम्बो कोविड सेंटर असे प्रमुख सहा कोविड सेंटर सुरु.
  • या ६ जम्बो कोविड सेंटर्समध्ये मिळून ७ हजार ३०७ बेडस् आहेत. ज्यात ३ हजार २०७ ऑक्सिजन बेड तर ४३२ आयसीयू बेड आहेत. सोबत लहान मुलांसाठी ६०० बेडदेखील आहेत.
  • संभाव्य तिसऱ्‍या लाटेमध्ये लहान मुलांना देखील कोविडची बाधा होवू शकते, हे लक्षात घेऊन लहान मुलांसह नवजात बाळांसाठी स्वतंत्र व जास्तीत जास्त बेड उपलब्ध करणे आवश्यक आहे.
  • यामध्ये जवळपास ११ हजार बेड हे ऑक्सिजन सह तर २,३४८ आयसीयू आहेत.
  • सोबतच, लहान मुलांसाठी १,५०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि २३० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील. नवजात बाळांसाठी ६० बेडदेखील यामध्ये बनविण्यात आले आहेत.
  • कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत (दि.२७ जून २०२१) मुंबईत एकूण ७ लाख २० हजार ३५६ बाधित रुग्ण आढळले. यापैकी ६ लाख ९४ हजार ०८२ (९६.३५ टक्के) रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
  • इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्यासाठी नियमित रुग्णालयांसोबतच जम्बो कोविड सेंटर्सनीदेखील खऱ्‍या अर्थाने मोलाचा हातभार लावला आहे.
  • मुंबईत जवळपास २० हजारावर कोविड बेड उपलब्ध आहेत. म्हणजेच बाधितांवर उपचारांसाठी पुरेशा संख्येने बेड उपलब्ध आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्तीबाबत प्राचार्यांना दिला हा गंभीर इशारा

Next Post

नाशिक – गणपती मंदिरात चोरीचा प्रयत्न, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
crime diary 2

नाशिक - गणपती मंदिरात चोरीचा प्रयत्न, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011