सध्या पावसाळा सुरू असून काही ठिकाणी रिमझिम श्रावण सरी बरसत आहेत. अशा वातावरणात काही लोक पर्यटनाचा आनंद लुटत असतात. अनेक पर्यटन स्थळी आपल्याला खाण्यासाठी भाजलेल्या शेंगा, तिखट – मीट लावलेले पेरू किंवा काकडी तसेच भाजलेले मक्याचे कणीस विकणारे बसलेले दिसतात. सहाजिकच आपल्याला असे पदार्थ खाण्याचा मोह होतो. विशेषतः मंद कोळशाच्या आगीवर भाजलेले गरमागरम मक्याचे कणीस असेल आणि त्याला थोडे मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस लावलेला असेल, तर रिमझिम पावसात ते खाण्यात खूप मजा येते. पावसाळ्यात ते खाण्याची चव वेगळी असते. तसेच कणीस खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊ या…
१ ) मक्याचे कणीस किंवा स्वीट कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर असतात. या शिवाय त्यात कमी दर्जाचे प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. तसेच
कॉर्न आपली दृष्टी स्पष्ट ठेवण्यास मदत करू शकते. त्यात जीवनसत्त्वे ए, बी आणि सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात.ही अँटीऑक्सिडंट्सची उच्च शक्ती आहे.
२ ) मका हा अनेक जीवनसत्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे.स्वीट कॉर्नमध्ये खनिजे जास्त असतात, या मध्ये उपयुक्त पोषक घटक असतात, त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. या कॉर्नमध्ये असलेले जीवनसत्त्वे केसांच्या मुळांमधील ओलावा आणि चमक पुन्हा भरण्यास मदत करतात.
३ ) कॉर्न बिया या लोह आणि जीवनसत्त्वे यांनी समृध्द असून रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात. यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि लाइकोपीन असतात, म्हणून न्याहारीसाठी कॉर्न खाणे चांगले आहे. ते खाल्ल्याने संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते.
४ ) विशेष म्हणजे मक्याचे कणीस हे भाजून किंवा वाफवून खाता येते तसेच त्याचे सूफ, वरण आणि भाजी घालून बनवता येते. कॉर्नमध्ये भरपूर कर्बोदके असतात. आरोग्यासाठी याचे अनेक फायदे असले तरी, कोणत्याही गोष्टीचा जास्त वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.